विश्वासाची परंपरा सोलंकी ज्वेलर्स
दिवाळी म्हणजे लखलखत्या आकाशी दिव्यांचा झगमगाट, दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी दिवाळी म्हणजे ची मेजवानी, दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांचा पेहराव आणि दिवाळी म्हणजे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी
सोलंकी कुटुंबीयातील छगनराज मानमल सोलंकी यांनी गेल्या ऐशी पूर्वी सोन्या-चांदीची पेदी मालवून या व्यवसायात नावलौकीक संपादन केला आहे. १९८३ मध्ये भोसरीतील दिघी रस्त्यावर सोलंकी ज्वेलर्सची सुरवात झाली. तर १९९० मध्ये सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरवमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे साडेतीन हजार चौरस फुटामधील दुमजली सर्वात मोठे शोरूम सांगवीत सोलंकी ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून उघडण्यात आले. सोलंकी कुटुंबीयातील कनकराज सोलंकी, मदनकुमार सोलंकी, अशोक सोलंकी, मुकेश सोलंकी या चार बंधूंसह त्यांची मुले मयूर सोलंकी, राहूल सोलंकी, हिमांशू सोलंकी, मेहल सोलंकी, अमित सोलंकी ही सोलंकी कुटुंबीयातील चौथी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवत सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधील नवनवीन अलंकाराने या व्यासायाला नवा आयाम दिला आहे. ग्राहकांनाही पारंपरिक सोन्या-चांदीच्या दागिन्याबरोबर नाविन्यपूर्ण दागिने मिळत असल्याने तरुण-तरुणींपासून ज्येष्ठ नागरिकांचीही सोलंकी ज्वेलर्समधून दागिने खरेदी करण्यासाठी पसंती आहे.अस्सल हॉलमार्कमधील सोन्यांच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी सोलंकी ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत.