सोलंकी ज्वेलर्स भोसरी व सांगवी यांच्या उत्कृष्ट व निवडक दागिन्यांच्या प्रदर्शनानिमित्त वसुधा शिंदेज मेकओव्हर यांच्यासह नामांकित मॉडेल्स यांचा सहभाग
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विश्वसनीय ज्वेलरी अँड पैकी एक असेलेले सी. एन. जे. ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड चे “सोलंकी ज्वेलर्स तर्फे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया व लग्नसराई निमित्त निवडक दागिन्यांचे दी ग्रेड बंगल्स प्रदर्शन व दि अँड डायमंड ज्वेलरी प्रदर्शन दिनांक १ मे ते १० दरम्यान भोसरी व सांगवी अशा दोन्ही शाखांमध्ये भरविले आहे. या उत्कृष्ट व निवडक दागिन्यांच्या प्रदर्शनात वसुधा शिंदेज मेकओव्हर च्या संचालिका सौ. वसुधा शिंदे यांनी जाहिरातीच्या रुपाने मोलाचा वाटा उचलला. त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील काही नामांकित मॉडेल्स यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रमोशन केले. सौ बसुधा शिंदे स्वतः एक मॉडेल असून त्या नामांकित मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत त्यांनी व त्यांच्या सहकान्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व मॉडेल्स चा मेकअप, हेअर स्टाईल व पारंपरिक वेशभूषा करून त्यांचे सौंदर्य खुलवले. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या मॉडल्स सृष्टी सोनवणे (कोरडे), शीतल कुबेर, अमृता राय, पूजा बेल्हेकर, प्रज्ञा बेल्हेकर, सोनल पाटील, तृप्ती बोरगावकर यांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली. सोलंकी ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक भी राहुल सोलंकी यांनी या सर्व महिलांना विविध प्रकारची दागिने परिधान करण्याची संधी देवून त्यांचे सौंदर्य जणू द्विगुणित केले आणि सर्व मॉडेल्सनी दिलखुलास असा अनुभव घेवून मनमुराद आनंद लुटला. सोलंकी ज्वेलर्स यांची ३८ वर्षांची परंपरा असेलेल हे दागिन्यांचे प्रदर्शन रूपी दालनात जणू अप्सराच अवतरल्याचा अनुभव येत होता. सोलंकी ज्वेलर्स चे सर्व कार्यकारणी सदस्यांनी या मॉडेल्सला असे मौल्यवान दागिने प्रदर्शनात बहाल करून त्यांचे ब्रीदवाक्य “नाते शुद्धतेशी” हे म्हणणे सार्थक केले.